फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - वैशालीचा पहिला विजय; झु जायनरची बरोबरीत सुटका

आयएम नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गारिया) हिने जीएम जिनेर झू (चीन) विरुद्धच्या डावात आपल्या वजिराचा बळी देत फक्त हत्ती आणि घोड्यासाठी ती चाल खेळली. या खेळात तिला विजय मिळवण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण ती त्या संधींचा पुरेपूर फायदा घेऊ शकली नाही आणि फिडे पुणे ग्रँड प्रिक्सच्या पाचव्या फेरीतील हा सामना बरोबरीत सुटला आणि झू जायनर हिने आपली आघाडी कायम ठेवली. जीएम आर वैशाली हिने आयएम बाथकुईग मुङ्गुंतुुल (मंगोलिया) विरुद्ध आपला स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. भारताच्या दोन सर्वोच्च महिला बुद्धिबळपटू, जीएम कोनेरू हम्पी आणि जीएम हरिका द्रोणावल्ली यांनी केवळ १९ चालींत सामना बरोबरीत सोडला. आयएम दिव्या देशमुख हिने अत्यंत चुरशीच्या लढाईत आयएम पोलिना शुवालोव्हा विरुद्ध सामना बरोबरीत सोडवला. आज स्पर्धेचा विश्रांतीचा दिवस आहे. सहावी फेरी उद्या, रविवार २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होईल.